Join us  

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरवर सलमान खानची नजर !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 2:10 PM

मानुषी छिल्लर 17 वर्षांनंतर मिस वर्ल्ड 2017 चा किताब जिंकून एका रात्रीत लाइमलाइटमध्ये आली.  मिस वर्ल्ड बनल्यापासून बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक मानुषीला आपल्या चित्रपटात घेण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई: मानुषी छिल्लर 17 वर्षांनंतर मिस वर्ल्ड 2017 चा किताब जिंकून एका रात्रीत लाइमलाइटमध्ये आली.  मिस वर्ल्ड बनल्यापासून बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक मानुषीला आपल्या चित्रपटात घेण्याच्या तयारीत आहेत.  अनेकांनी तिला ऑफर देखील पाठवण्यास सुरूवात केली आहे. आमिर खान मानुषीचा आवडता अभिनेता असून तिला त्याच्यासोबत चित्रपटात काम करायचं आहे पण दबंग अभिनेता सलमान खान हा मानुषीला आपल्या चित्रपटात संधी देण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. 

मानुषीने सलमान खानला चांगलंच प्रभावित केलं आहे. मानुषीला दमदार डेब्यू देण्याची सलमान खानची इच्छा असल्याची मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. सलमान आपल्या होम प्रोडक्शनच्या सिनेमात मानुषीला लॉन्च करू शकतो अशी चर्चा आहे. सलमान त्याच्या बहिणीचा पती आयुष शर्मा याला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी नव्या चेह-याच्या शोधात तो आहे. पण सलमान खानकडून अजूनपर्यंत याबाबत अधिकृत विधान आलेलं नाही.

सलमान खान नेहमीच यंग टॅलेंटला संधी देण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वी त्याने सोनाक्षी सिन्हा, अथिया शेट्टी, डेजी शाह, जरीन खान, स्नेहा उलाल अशा अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये मानुषी छिल्लरने सध्यातरी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं होतं. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं कुटुंबीयांसोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन-

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं मायदेशी परतल्यानंतर सोमवारी (27 नोव्हेंबर)कुटुंबीयांसोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, मानुषी जवळपास अर्धा तास मंदिरात होती व तिनं बाप्पाची आरतीदेखील केली. यावेळी तिच्यासोबत आई-वडील व छोटा भाऊदेखील होता. 

शनिवारी (25 नोव्हेंबर) उशीरा रात्री मानुषीचे मुंबई विमानतळावर तिचे आगमन झाले. यावेळी तिचे भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर मानुषीचे भारतीय परंपरेनुसार जोरदार स्वागत करण्यात आले. मानुषीची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनीही विमानतळावर गर्दी केली होती.

17 वर्षांनी भारताला मिळाला बहुमानभारताच्या मानुषी छिल्लरनं 'मिस वर्ल्ड 2017' चा किताब जिंकला आहे.  या स्पर्धेत 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. हरियाणाची असलेली मानुषी छिल्लर 20 वर्षांची आहे. यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्रा हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.प्रश्नोत्तराच्या फेरीत मानुषीने आईविषयी दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे ?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मानुषी म्हणाली, 'माझ्या मते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. माझ्यासाठी माझी आई प्रेरणास्थान आहे.

जगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असे प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा', असे तिने सांगितले. आईला कॅश सॅलरी देऊन भागणार नाही, तिचा गौरव व्हावा. तिला भरपूर प्रेम मिळायला हवे.' मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही हरियाणातील सोनीपत येथील राहणारी आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे. 7 मे 1997 रोजी दिल्लीत मानुषीचा जन्म झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फॅन असलेल्या मानुषी हिला माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रासारखे बनण्याची इच्छा आहे.

  Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

टॅग्स :मानुषी छिल्लरविश्वसुंदरीसलमान खान