Join us  

करिश्मासोबत शूट करताना सलमान होता दारुच्या नशेत; 'चल मेरे भाई' मधलं गाणं सुरु झालं अन...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 11:23 AM

Salman khan: सलमानच्या अशा वागण्यामुळे सिनेमाचं चित्रीकरण ऐन मध्यावर थांबवावं लागलं होतं.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान (salman khan) याने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. त्यामुळे कलाविश्वात कायम त्याच्या नावाची चर्चा रंगत असते. देशासह विदेशातही त्याचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे सलमानच्या प्रत्येक सिनेमाविषयी वा त्याच्या पर्सनल आयुष्याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. अलिकडेच 'टायगर 3' मध्ये झळकलेला सलमान बऱ्याचदा रिअॅलिटी शो वा टॉक शो मध्ये हजेरी लावत असतो. या कार्यक्रमांमध्ये अनेकदा सलमानने त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी भाष्य केलं आहे. यामध्ये त्याची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. यात त्याने 'चल मेरे भाई' या सिनेमाचं चित्रीकरण दारु पिऊन केलं होतं.

सध्या सोशल मीडियावर सलमानची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. सलमानने करण जोहरच्या काफॉ विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी करणने सलमान सिनेमाच्या सेटवर दारुन पिऊन गेल्याचा नेमका प्रसंग काय होता? असा प्रश्न विचारला. त्यावेळी सलमानने चल मेरे भाई या सिनेमाच्या वेळी घडलेला किस्सा सांगितला.

'चल मेरे भाई' या सिनेमातील माझा रोल आणखी चांगल्या प्रकारे कसा करता येईल याचा मी विचार करत होतो. त्यामुळे मी दारुचा आधार घेतला. पण, रिकाम्यापोटी दारु प्यायल्यामुळे त्याची नशा पटकन चढली. परिणामी, दारुची नशा चढल्यामुळे या सिनेमातील गाण्याचे लिरिक्स मला नीट बोलता येत नव्हते. मला लिप-सिंकचं करता येत नव्हतं. त्यामुळे त्या दिवसाचं शुटिंगचं शेड्यूल कॅन्सल करावं लागलं, असा किस्सा सलमानने सांगितला.

दरम्यान, सलमानचा 'चल मेरे भाई' हा सिनेमा २००० साली रिलीज झाला होता. दिपक शिवदासानी आणि डेव्हिड धवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात सलमान व्यतिरिक्त संजय दत्त, करिश्मा कपूरदेखील मुख्य भूमिकेत झळकले होते.

टॅग्स :सलमान खानसंजय दत्तकरिश्मा कपूरबॉलिवूडसिनेमा