सलमान खानचा 'सिकंदर' ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ३० मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. भाईजानच्या या सिनेमाची चाहते खूप आतुरतेने वाट पाहत होते. 'सिकंदर'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र तीन दिवसांतच सलमानच्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हवा टाईट झाल्याचं दिसत आहे.
'सिकंदर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी २६ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २९ कोटींची कमाई करत मंडे टेस्टमध्ये हा सिनेमा पास झाला होता. मात्र तिसऱ्या दिवशी सोमवारच्या तुलनेत 'सिकंदर'ची कमाई तब्बल १० कोटींनी घटली. या सिनेमाने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर १९.५ कोटींची कमाई केली. आत्तापर्यंत 'सिकंदर'ने केवळ ७४.५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
'सिकंदर'मध्ये सलमानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर २०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाची सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन अशी स्टारकास्ट आहे.