ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर लवकरच नव्या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर हा सिनेमा साकारणार आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने ट्विट करून आकाशच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.
"एफयू" असं या सिनेमाचं नाव असून 2 जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आकाश ठोसर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान खानने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ‘एफयू’चं पोस्टर रिलीज केलं आहे.
या सिनेमात आकाशची भूमिका काय असणार याबाबत अजूनपर्यंत मौन पाळण्यात आलेले आहे. त्यामुळे सैराट सिनेमातून परशा म्हणून ओळख निर्माण झालेल्या आकाशची सिनेमाद्वारे निरनिराळे विषय हाताळणा-या मांजरेकरांच्या सिनेमात कोणती भूमिका असणार आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.