Join us  

सलमान खान-कतरिना कैफ पुन्हा एकत्र

By admin | Published: March 22, 2017 2:47 PM

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकत्र आलेत. दोघांचा एक शानदान फोटोही सलमाननं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकत्र आलेत. दोघांचा एक शानदार फोटोही सलमाननं सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता ते एकत्र आलेत म्हणजे त्यांचे पॅच अप झालं, असे तुम्हाला वाटत असले. तर तुमच्या विचारांना जरा ब्रेक लावा. सल्लू मियाँ आणि कॅट पुन्हा एकत्र येण्यामागील कारण आहे त्यांचा आगामी सिनेमा  'टायगर जिंदा है'. 
सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचाच हिस्सा असलेला हा शानदान फोटो सलमान खाननं शेअर केला आहे.
 
'BACK TOGETHER , IN TIGER ZINDA HAI', असं कॅप्शनही त्यानं फोटोला दिलं आहे. 'टायगर जिंदा है'  हा सिनेमा 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'टायगर' या सिनेमा सिक्वेल आहे. या सिनेमातही सलमान-कॅट एकत्र दिसले होते.
(अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमानच सुलतान)
कतरिना आणि सलमान सध्या ऑस्ट्रियामध्ये  'टायगर जिंदा है' सिनेमाचे शुटिंग करत आहेत.   दरम्यान, सिनेमाच्या निर्मात्यांनी अॅक्शन सीनसाठी 'डार्क नाईट'चे अॅक्शन दिग्दर्शक टॉमची निवड केली आहे. हा सिनेमा डिसेंबर महिन्यात बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.