Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरिजीतला डावलून सलमानने या पाकिस्तानी गायकाला दिली गाण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 10:40 IST

गायक अरिजीत सिंह व अभिनेता सलमान खान यांच्यातील कोल्डवॉर काही केल्या कमी होत नाही.

मुंबई- गायक अरिजीत सिंह व अभिनेता सलमान खान यांच्यातील कोल्डवॉर काही केल्या कमी होत नाही. 2014 पासून सुरू झालेलं हे कोल्डवॉर आजही सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे. अभिनेता सलमान खानने त्याच्या सिनेमातील गाणं अरिजीत सिंहच्या जागी एका दुसऱ्या गायकाला दिलं आहे. याआधीही सलमानने अरिजीतला रिप्लेस करून दुसऱ्या गायकाला गाणं गाण्याची संधी दिली होती. 

सलमान खानने 'वेलकम टू न्यूयॉर्क'मधील गाणं 'इश्तिहार'साठी अरिजीत सिंहच्या ऐवजी पाकिस्तानी सिंगर राहत फतेह अली खान यांची निवड केल्याचं समजतं आहे. 'वेलकम टू न्यूयॉर्क' सिनेमात अभिनेता सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील 'नैन फिसल गए' या गाण्यात अभिनेता सलमान खान व सोनाक्षी सिन्हा एकत्र दिसणार आहेत. 

याआधी सलमान खानने सुल्तान या सिनेमाती  'जग घूमेया' हे गाणं अरिजीतकडून काढून घेऊन राहत फतेह अली खान यांना दिलं होतं. तसंच 'टाइगर जिंदा है' मधील 'दिल दियां गलां' हे गाणं आतिफ असलमला दिलं होतं. 

नेमका वाद कशावरून?सलमान व अरिजीत सिंहमधील भांडण 2014मध्ये सुरू झालं. एका पुरस्कार सोहळ्यात अरिजीतला सर्वोत्कृष्ठ गायकाचा पुरस्कार मिळाला होता. अरिजीत पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आला तेव्हा सुत्रसंचालन करणाऱ्या सलमानने अरिजीतबरोबर मस्करी केली. झोपला होतास? असा प्रश्न सलमानने विचारला. त्या प्रश्नाला अरिजीतने उत्तर दिलं. सलमानच्या होस्टिंग स्टाइलला उद्देषून अरिजीत म्हणाला, तुम्ही लोकांनी झोपायला लावलं. सलमानने नंतर अरिजीतच्या 'तुम ही हो', गाण्याला टार्गेट केलं. अशी गाणी वाजली तर झोप येणारच, असं सलमान खान म्हणाला होता.  

टॅग्स :सलमान खानअरिजीत सिंहबॉलिवूड