Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेम रतन धन' मिळवण्यात सलमान पुन्हा अपयशी ?

By admin | Updated: October 4, 2016 20:37 IST

बॉलिवूड अभिनेता सलमान खान प्रेमाच्या बाबतीत नेहमीच अनलकी राहिला आहे. कॅटरीना कैफ, ऐश्वर्या रॉय, सोमी अली आणि संगीता बिजलानी यांसारख्या अभिनेत्रींसोबत

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 4 - बॉलिवूड अभिनेता सलमान खान प्रेमाच्या बाबतीत नेहमीच अनलकी  राहिला आहे. कॅटरीना कैफ, ऐश्वर्या रॉय, सोमी अली आणि संगीता बिजलानी यांसारख्या अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या सलमान खानचं कोणतंच नातं लग्नापर्यंत मात्र टिकू शकलं नाही.  
 
अनेक दिवसांपासून रोमानियन ब्यूटी लुलिया वेंतुरसोबत सलमानचं नाव चांगलंच चर्चेत आहे. दोघांच्या  रोमांन्सच्या बातम्याही नेहमी ऐकायला येतात.  यावर्षी दोघं लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, Bollywoodlife.com ने दिलेलं वृत्त सलमानच्या चाहत्यांसाठी नक्कीच निराशाजनक आहे.
 
या वृत्तानुसार, सलमान आणि लुलियाचं नातं संपुष्टात आलं आहे. इतकंच काय तर दोघं या नात्याला दुसरा 'चान्स' द्यायलाही तयार नाहीत. लुलियाचा व्हिजा संपला असून ती सध्या रोमानियात आहे आणि भारतात परत यायची तिची इच्छाही नाही . सलमान लुलियाला कोणत्याही प्रकारची 'कमिटमेंट' देत नव्हता त्यामुळे लुलिया त्याच्यावर नाराज झाल्याची चर्चा आहे.