Join us

सलमान-दीपिकाची जोडी

By admin | Updated: November 2, 2014 00:47 IST

दीपिका पदुकोण आता बॉलीवूडची क्वीन बनली आहे. शाहरुख खानसोबत तर तिने अनेक चित्रपट केले आहेत; पण लवकरच सलमान खानसोबत काम करण्याची तिची इच्छाही पूर्ण होणार आहे.

दीपिका पदुकोण आता बॉलीवूडची क्वीन बनली आहे. शाहरुख खानसोबत तर तिने अनेक चित्रपट केले आहेत; पण लवकरच सलमान खानसोबत काम करण्याची तिची इच्छाही पूर्ण होणार आहे. सूत्रंनुसार यशराज बॅनर्सने या दोघांना एकत्र साईन करण्याची योजना आखली आहे. ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ फेम दिग्दर्शक अली अब्बास जफर त्याच्या आगामी चित्रपटात या जोडीला साईन करू इच्छितो. या चित्रपटासाठी सलमानला साईन करण्यात आल्याचे सूत्रंचे म्हणणो असून, त्यानेच दीपिकाचे नाव सुचविल्याचे कळते. सलमानसोबत काम करण्याची ही संधी दीपिकाही सोडणार नाही, अशी आशा आहे. यशराज बॅनरच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटात सलमानने पहिल्यांदाच काम केले होते. या चित्रपटात कॅटरिना कैफ त्याच्या नायिकेच्या भूमिकेत होती.