Join us

सलमान खानने केलं सलीम खान यांचं ट्विटरवर स्वागत

By admin | Updated: March 30, 2016 13:28 IST

सुप्रसिद्ध लेखक सलीम खान यांनीदेखील ट्विटर अकाऊंट सुरु केले असून सलमान खानने वडिलांचं स्वागत केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ३० - सुप्रसिद्ध लेखक सलीम खान यांनीदेखील ट्विटर अकाऊंट सुरु केले असून सलमान खानने वडिलांचं स्वागत केलं आहे. सलमान खानने 'लव्ह यू डॅड' असा मेसेज टाकत सलीम खान यांचं स्वागत केलं आहे. सलीम खान यांनी ट्विटर अकाऊंट सुरु केल्यानंतर एकाच दिवसांत 12 हजार फॉलोअर्स झाले आहेत. 
 
सलीम खान यांनी 'भारत माता की जय' म्हणत पहिलं ट्विट केलं आहे. सलीम खान यांनी तीन भागात ट्विट केलं असून मोहन भागवत यांचा उल्लेख केला आहे. गेले अनेक दिवस 'भारत माता की जय' बोलण्यावरुन सुरु असलेल्या वादावरुन त्यांनी हे ट्विट केलं आहे. 'मोहन भागवत म्हणतात की आपल्याला भारत घडवायचा आहे जेणेकरुन मोठी लोक स्वत:हून भारतमाता की जय म्हणतील. अनेक लोक अभिमानाने सांगतात की ते बदलले नाही आहेत. याचा अर्थ त्यांची प्रगती झालेली नाही. बदल हीच प्रगती आहे. भारत माता की जय' असं ट्विट सलीम खान यांनी केलं आहे.