बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येतेय. ९० वर्षीय सलीम खान यांना मंगळवारी सकाळी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आता डॉक्टरांनी अपडेट दिले आहेत.
लीलावती रुग्णालयात सलीम खान यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जलिल पारकर यांनी त्यांच्या हेल्थबाबत सांगितलं की त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर म्हणाले, "त्यांना मिनिमल ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर DSA (डिजिटल सबट्रैक्शन एंजियोग्राफी) करण्यात आली आहे. सर्जरी करण्याची गरज भासली नाही. पण ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचं वय पाहता त्यांना बरं व्हायला वेळ लागेल. पण त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे".
"जेव्हा सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांना उच्च रक्तदाब होता. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. सुरक्षिततेचा भाग म्हणून आणि काही प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं", असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. सलीम खान यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर संपूर्ण खान कुटुंब लीलावती हॉस्पिटलला पोहोचलं होतं.
Web Summary : Salim Khan, 90, is hospitalized due to high blood pressure and minimal brain hemorrhage. Doctors performed DSA; surgery was not required. He's stable but on a ventilator, with gradual improvement expected given his age. The family is at the hospital.
Web Summary : 90 वर्षीय सलीम खान उच्च रक्तचाप और मामूली ब्रेन हेमरेज के कारण अस्पताल में भर्ती हैं। डॉक्टरों ने डीएसए किया; सर्जरी की आवश्यकता नहीं थी। वह स्थिर हैं लेकिन वेंटिलेटर पर हैं, उनकी उम्र को देखते हुए धीरे-धीरे सुधार की उम्मीद है। परिवार अस्पताल में है।