बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान (Salim Khan) यांची प्रकृती आता सुधारली आहे. त्यांना मंगळवारी सकाळी मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ९० वर्षीय सलीम खान यांना गेल्या एका महिन्यापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता ते सुरक्षितपणे आपल्या 'गॅलेक्सी' निवासस्थानी परतले आहेत.
सलीम खान यांना १७ फेब्रुवारी रोजी मेंदूमध्ये सौम्य रक्तस्राव (Brain Hemorrhage) झाल्यामुळे तातडीने लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूतील रक्ताच्या गुठळीवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने एक छोटी पण महत्त्वाची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर महिनाभर ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते.
सलीम खान यांच्यावर उपचार करणारे डॉ. पारकर यांनी माहिती दिली की, "त्यांच्या मेंदूतील रक्तस्राव सौम्य स्वरूपाचा होता. केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मात्र, त्यांचे ९० वर्षे वय लक्षात घेता, त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही काळ विश्रांतीची गरज लागेल".
सिनेसृष्टीतील दिग्गजांनी घेतली भेटसलीम खान रुग्णालयात असताना त्यांना भेटण्यासाठी सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. याशिवाय, बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख आणि 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे, सलीम खान यांचे जुने मित्र जावेद अख्तर यांनीही त्यांची भेट घेतली होती. सध्या सलीम खान यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरीच पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या घरी परतण्याने खान कुटुंबासह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Web Summary : Salim Khan discharged from Lilavati Hospital after brain hemorrhage treatment. A minor surgery was performed successfully. Doctors say his condition is stable, and he needs rest. Bollywood stars like Shah Rukh Khan and Aamir Khan visited him. The family is relieved.
Web Summary : सलीम खान को ब्रेन हेमरेज के बाद लीलावती अस्पताल से छुट्टी मिली। सफल सर्जरी हुई। डॉक्टरों का कहना है कि उनकी हालत स्थिर है, आराम की जरूरत है। शाहरुख और आमिर जैसे सितारे मिलने आए। परिवार ने राहत की सांस ली।