Join us
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी तन्वरला कुणी दिले महागडे गिफ्ट!

By admin | Updated: February 13, 2017 02:40 IST

बॉक्स आॅफिसवर यशाचे झेंडे रोवणाऱ्या ‘दंगल’मध्ये आमिर खानच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी तन्वर सध्या जाम खूश आहे.

बॉक्स आॅफिसवर यशाचे झेंडे रोवणाऱ्या ‘दंगल’मध्ये आमिर खानच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी तन्वर सध्या जाम खूश आहे. ‘दंगल’चे यश हे तिच्या आनंदाचे कारण आहे हे सांगयलाच नको, तिच्या या यशासाठी साक्षीला एक खास गिफ्ट मिळाले हे यामुळे तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या नव्या कोऱ्या कारसोबत फोटो अपलोड केला आहे. म्हणे साक्षीला ही महागडी व्हॉल्वो कार गिफ्ट मिळाली आहे. दंगलमध्ये साक्षीच्या कामाची प्रशंसा झाली होती. दंगलमध्ये तिने महावीर सिंग फोगटची पत्नी दया कौर ही भूमिका साकारली होती. वयाच्या दोन टप्प्यातील भूमिका साकारण्यासाठी साक्षीने चांगलीच मेहनत घेतली होती. या भूमिकेसाठी तिने गोवऱ्या देखील थापल्या. याचे फोटो दंगलच्या प्रदर्शनापूर्वी व्हायरल झाले होते.दंगलच्या सर्व कलावंतांच्या कौतुक होत असताना मात्र साक्षी थोडी मागे पडली की काय असे वाटत होते. दंगलच्या यशाचे सेलिब्रेशन साक्षीने आपल्या पद्धतीने करण्याचे ठरविले अन्् तिने स्वत:लाच व्हॉल्वो कंपनीची महागडी कार गिफ्ट केली. आपल्या या कारसोबतचा फोटो तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. आपल्या कामाचे कौतुक करण्याचा साक्षीचा हा फंडा सर्वांनी कॉपी करावा असाच आहे असे म्हणायला हरकत नाही.