Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाबा माझ्या हृदयात आणि रक्तात तुम्ही कायम आहात’ वडिलांच्या आठवणीत सखी गोखलने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 13:51 IST

सखीने इन्स्टाग्रामवर तिचा एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे सखी गोखले हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. यानंतर ती दिल दोस्ती दोबारा या मालिकेत देखील मुख्य भूमिकेत झळकली. सखी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. सखी तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सखीने इन्स्टाग्रामवर तिचा एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोत ती वडील आणि अभिनेते मोहन गोखले यांच्यासोबत खेळताना दिसतेय. मोहन गोखले यांच्या स्मृतीदिनी सखीने एक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. सखीने लिहिले, गेल्या 22 वर्षांत मी अनेक चांगल्या माणसांना भेटले, चांगल्या ठिकाणी फिरले, तुम्ही लिहून ठेवलेली पुस्तके वाचली, तुमचे कपडे देखील घातले आणि त्यानंतर डोक्यात विचार आला तुमचं देखील या गोष्टींवर प्रेम होते का ? सध्या ज्या कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतोय त्यात तुम्हीसोबत नाहीत आहात. बाबा  मी नेहमीच विचार करते तुम्ही माझ्या रक्तात, माझ्या हृदयात कायम आहात. दिवंगत अभिनेता मोहन गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची सखी कन्या आहे. 

सखी पती आणि अभिनेता सुव्रत गोखलेसोबतचे फोटोही सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करत असते. दोघांमधील क्युट केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडते. २०१५ साली दुनियादारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेच्या सेटवरच सुव्रत व सखीची ओळख झाली. या मालिकेत काम करत असतानाच सुव्रत व सखी यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलले. 

टॅग्स :सखी गोखलेसुव्रत जोशी