Join us
Daily Top 2Weekly Top 5

साजीदचे आणखी तीन चित्रपट करणार कृती

By admin | Updated: August 15, 2014 23:52 IST

हिरोपंती या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या कृती सेननकडे सध्या अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत.

हिरोपंती या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या कृती सेननकडे सध्या अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. हिरोपंतीचा निर्माता साजीद नादियाडवालाच्या आणखी तीन चित्रपटांत कृती दिसणार असल्याची बातमी आहे. याबाबत कृती म्हणाली की, ‘साजीद सरांसोबत जितके चित्रपट करावेत तेवढे कमीच आहेत. त्यांच्यासोबत तीन चित्रपटांबाबत चर्चा झाली आहे; पण बंधने नाहीत. आता तर ते दिग्दर्शन क्षेत्रातही आले आहेत आणि पहिल्याच किक या चित्रपटाने सर्वच रेकॉर्डस् तोडले आहेत.