Join us

"हिरोइनला स्पर्श करताना थरथरत होतो अन्...", 'सैयारा'च्या अभिनेत्याने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:04 IST

"तेव्हा थरथरत होतो...",'सैयारा' मधील सीन शूट करताना अभिनेत्याची झालेली अशी अवस्था, म्हणाला...

Saiyaara Movie: सध्या तरुणाईसह सोशल मीडियावरही सर्वत्र 'सैयारा' (Saiyaara) चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते आहे. मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा'ची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अहान पांडे व अनित पड्डा हे कलाकार यामुळे विशेष चर्चेत आहेत. शिवाय या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारुन अभिनेता शान ग्रोव्हर भाव खाऊन गेला. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या अभिनेत्याने चित्रपटाच्या शूटिंगचे किस्से शेअर केले आहेत. 

प्रदर्शित झाल्यापासून या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'सैयारा'मध्ये शान ग्रोव्हरने वाणी म्हणजेच अनीत पड्डाच्या एक्स बॉयफ्रेंडची भूमिका साकारली आहे. अलिकडेच, 'फिल्मीग्यान' ला दिलेल्या मुलाखतीत शानने एका सीनच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे, तो सीन करताना घाबरलो होतो असं त्याने सांगितलं, त्याविषयी तो म्हणाला, "महेश हे पात्र साकारणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. मी चित्रपटात सीन शूट करताना अनीतच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हतो. पण, यासाठी मोहित सरांनी माझी खूप मदत केली. त्यामुळेच मी महेशचं पात्र उत्तमरित्या साकारु शकलो. "

त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला," माझ्याकडून सीन चांगले होतच नव्हते. रिटेक घ्यावे लागत होते. मी घाबरलेलो, थरथर कापत होतो, मग मोहित सरांनी मला प्रत्येक सीन समजावून सांगितला. खरंतर, या व्यतिरिक्त मी गॅंगस्टर किंवा इतर कोणतीही भूमिका करेन, पण एका मुलीसोबत वाईट वागणं मला जमतच नव्हतं. त्यावेळी पार्टीसीनमध्ये अनीतला स्पर्श करण्याचा तो सीन होता. त्याचे जवळपास २० टेक झाले. सगळेच तिथे होते, पण मला तू असं कर तसं कर सांगत होते. पण काहीच घडत नव्हतं. यातून मी असा आहे वगैरे हे मला सांगायची गरज नाही पण, तो सीन करणं खरंच माझ्यासाठी आव्हान होतं."असा खुलासा करत अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :मोहित सुरीबॉलिवूडसिनेमा