Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफने केले परिणितीला नाराज

By admin | Updated: August 6, 2014 22:55 IST

परिणिती चोप्रा अभिनेता सैफ अली खानची मोठी फॅन आहे.

परिणिती चोप्रा अभिनेता सैफ अली खानची मोठी फॅन आहे. तिच्या या आवडत्या कलाकारासोबत काम करण्याची नामी संधी परिणितीला मिळाली होती; पण सैफला वेळ नसल्याने हा चित्रपट काही काळ लांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. सैफचा बिजनेस पार्टनर असलेल्या दिनेश विजानच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनवण्यात येणार होता.रीमा कागतीच्या एका चित्रपटासाठी सैफला वेळ द्यावा लागणार आहे. 
तर  सध्या परिणिती तिच्या ‘दावत-ए-इश्क’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यानंतर ‘शाद अलीच्या किल दिल’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल; पण त्यानंतरही परिणितीला सैफसोबत काम करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.