१६ जानेवारी रोजी सैफ अली खान(Saif Ali Khan)च्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस आरोपींची चौकशी करत असून यादरम्यान नवनवीन खुलासेही करत आहेत. सैफवर हल्ला करणारा शरीफुल इस्लाम हा एजेंटच्या मदतीने भारतात घुसल्याचे आता पोलीस तपासात समोर आले आहे. त्यासाठी त्याने एजेंटला पैसेही दिले होते.
पोलीस तपासात असे समोर आले की, अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी शरीफुल इस्लामला बांगलादेशातून भारतात येण्यास मदत करणाऱ्या एजंटने या बदल्यात आरोपींकडून १०,००० रुपये घेतले होते. शरीफुल इस्लाम हा दहा हजार रुपये देऊन एजेंटच्या मदतीने डवकी नदीमार्गे भारतात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एवढेच नाही तर एजेंटने शरीफुलला आसामला जाण्यासाठी मदत केली आणि नंतर कोलकात्याच्या बसमध्ये चढवले होते.
सिमकार्ड मिळवण्यासाठी एजेंटने केली मदतचौकशीदरम्यान आरोपीने असेही सांगितले की, एजेंटने त्याला सिमकार्ड मिळवून देण्यात मदत केली होती. बांगलादेशातून कोलकाता येथे पोहोचल्यानंतर तो तीन दिवस कोलकात्यात राहिला आणि नंतर मुंबईला पोहोचला.
पोलिसांनी क्राईम सीन केला रिक्रिएटया सगळ्या दरम्यान पोलिसांनी काल सैफच्या घरी आरोपींसोबत क्राईम सीन रिक्रिएट केला. यावेळी आरोपीने सांगितले की, गेटवर गार्ड झोपले होते आणि तो भिंतीवर चढून इमारतीत घुसला होता. आरोपीने सांगितले की, संपूर्ण इमारतीतील सर्व डक्ट बंद होत्या, तर सैफ अली खानच्या घराचा मागील दरवाजा उघडा होता आणि तो चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता. हे सैफ अली खानचे घर आहे हे त्याला माहीत नव्हते असेही आरोपीने सांगितले. बातम्या पाहून त्याला या सर्व प्रकाराची माहिती मिळाली. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
सैफला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्जसैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतला. चाकूच्या हल्ल्यानंतर अभिनेत्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला जिम आणि शूटिंग करण्यासही मनाई आहे.
सैफ रुग्णालयातून डिस्चार्जकाल सैफ अली खानही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतला. चाकूच्या हल्ल्यानंतर अभिनेत्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याला जिममध्ये जाऊन शूटिंग करण्यासही मनाई आहे.