Join us

"मुलांची काळजी वाटते..." तैमुरच्या जुन्या नॅनीची प्रतिक्रिया, सैफवरील हल्ल्यानंतर घाबरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:38 IST

मला खूप वाईट वाटतंय. तैमूर आणि जेहची...

सैफ अली खानवर  मध्यरात्री त्याच्या घरातच घुसलेल्या एका अज्ञाताने हल्ला केला. सैफ सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने सर्वच हादरले आहेत. हल्ला करणारा आरोपी अजूनही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. हा आरोपी सैफच्या घरात त्याच्या मुलांच्या बेडरुममध्ये घुसला होता. तिथे असणाऱ्या जेहच्या नॅनीला जाग आली. मात्र त्या चोराने तिला ओलीस ठेवलं. दुसऱ्या नॅनीने आरडाओरडा केल्यावर सैफ धावत आला. तेव्हाच त्याच्यावर हल्ला झाला. हा सर्व प्रसंग हादरवून सोडणारा आहे. त्यातच हे सगळं तैमुर आणि जेह या चिमुकल्यांसमोरच घडलं. तैमुरची आधीची नॅनी ललिता डिसिल्व्हा (Lalita Dsilva) यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

'पिंकव्हिला'ला ललिता डिसिल्व्हा म्हणाल्या, "मला खूप वाईट वाटतंय. तैमूर आणि जेहची सध्या काय मानसिक स्थिती असेल याची मी कल्पनाही करु शकत नाही. विशेषत: जेह बाबा...तो अजून खूपच छोटा आहे. ते खरोखर खूपच घाबरले असतील. घटना पूर्ण ऐकल्यानंतर मला भीतीच वाटत आहे. आरोपी नक्कीच पकडला जाईल आणि त्याला शिक्षा होईल मला विश्वास आहे. माझं अद्याप करीनाशी किंवा अजून कोणाशीही बोलणं झालेलं नाही पण ते सुरक्षित असतील अशी मी प्रार्थना करते."

एकीकडे घटना घडल्यानंतर काल रात्रीच करिना कपूर खानने इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली. "आमच्या कुटुंबासाठी आजचा दिवस खूप आव्हानात्मक राहिला. आम्ही सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच हे सगळं नेमकं कसं घडलं, याचा विचार करत आहोत. या कठीण प्रसंगी मी प्रसारमाध्यमं आणि पापाराझींना विनंती करते की, कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, तसेच अयोग्य असेल असं कुठलंही वृत्तांकन करू नका." असं ती म्हणाली.

सैफ अली खान वर परवा पहाटेच यशस्वी सर्जरी झाली. सुदैवाने आता तो सुखरुप आहे. त्याला आज आयसीयूमधून नॉर्मल रुममध्ये शिफ्ट केलं जाऊ शकतं. दरम्यान बांद्रा मधील सेलिब्रिटी सतत लक्ष्य होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरतैमुरपरिवार