Join us

अजयविरुद्ध सैफ

By admin | Updated: October 22, 2014 04:30 IST

एकच विषय किंवा कथेवर एकाच वेळी दोन किंवा तीन चित्रपट बनवण्याचा प्रकार बॉलीवूडमध्ये नेहमीच होत असतो. आताही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकच विषय किंवा कथेवर एकाच वेळी दोन किंवा तीन चित्रपट बनवण्याचा प्रकार बॉलीवूडमध्ये नेहमीच होत असतो. आताही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘द डिवोशन आॅफ सस्पेक्ट एक्स’ या जपानी पुस्तकावर आधारित चित्रपट बनवण्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरू आहे. या कथेचे अधिकार एकता कपूरने खरेदी केले आहेत, तर सुजॉय घोष चित्रपट दिग्दर्शित करणार असून सैफ अली खान यात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे कळते. गमतीशीर बाब म्हणजे याच कथेवर आधारित असलेला एक चित्रपट मल्याळम भाषेत दृश्यम या नावाने बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचा ंिहंदी रिमेक बनवण्यासाठी अजय देवगणने अधिकार खरेदी केले आहेत. तो या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या विचित्र परिस्थितीतून कसा मार्ग काढला जातो ते येणाऱ्या काळात कळेलच.