Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा की मुलगी? सई लोकूरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 18:57 IST

सई लोकूरने चाहत्यांना गुड न्युज दिलीय.

सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सई लोकूरने चाहत्यांना गुड न्युज दिलीय. सई आणि तिचा नवरा तिर्थदीप रॉय या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे. सईने सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करुन तिच्या सर्व फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केलीय. 

अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करताना असे म्हटले आहे की, 'मुलगी जन्माला आली आहे. ती निरोगी आणि सुंदर आहे... सर्वांचं तिच्यावर खूप प्रेम आहे. या विशेष काळात तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रार्थनांसाठी आम्ही कृतज्ञ आहोत'. 

तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहले, 'एका छोट्या गोंडस चेहऱ्याच्या रुपात देवाचा आशिवार्द...आमच्या बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत'. सईने शेअर केलेल्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. चाहते आणि मनोरंजन विश्वातील मंडळींनी अभिनेत्रीला यानिमित्ताने भरभरुन शुभेच्छा दिल्या. 

सई आणि तीर्थदीप यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये एकमेकांशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या साखरपुडा आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर विशेष चर्चेत आले होते. आता हे जोडपं आई-बाबा झाले आहेत. सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केलं आहे. बिग बॉस मराठीमुळे सईला विशेष लोकप्रियता मिळाली.

टॅग्स :सई लोकूरमराठीटिव्ही कलाकार