Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 11:10 IST

'मुरांबा' फेम अभिनेत्रीसाठी अर्जुन तेंडुलकरची पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर चर्चेत आला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुनने क्रिकेटविश्वात पाऊल ठेवलं. सध्या अर्जुन मुंबई इंडियन्स टीममध्ये आहे. पण, सध्या तो क्रिकेटमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अर्जुनने मराठी अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

'मुरांबा' फेम अभिनेत्री काजल काटेसाठी अर्जुन तेंडुलकरने पोस्ट केली आहे. शुक्रवारी(१४ जून) काजलच्या लग्नाचा वाढदिवस होता. अर्जुनने काजल आणि तिच्या नवऱ्याचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. काजल आणि तिचा नवरा प्रतिकला अर्जुनने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "हॅपी एनिवर्सरी काजल आणि प्रतिक" असं म्हणत त्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. अर्जुनने काजल आणि तिच्या नवऱ्यासाठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. 

काजलचा नवरा प्रतिक कदम हा मुंबई इंडियन्स टीमचं काम पाहतो. अनेकदा काजल नवऱ्याबरोबरचे फोटो पोस्ट करताना दिसते. दरम्यान, काजलने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'मुरांबा' या मालिकेतही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. पण, काही कारणांमुळे काजलने या मालिकेतून एक्झिट घेतली. 

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरटिव्ही कलाकारऑफ द फिल्ड