Join us

सचिन-सोनालीचा शटर डिसेंबर अखेरीत

By admin | Updated: October 31, 2014 23:51 IST

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट ‘शटर’चा रिमेक असलेला मराठी सिनेमा शटर डिसेंबर अखेरीत प्रदर्शित होणार आहे.

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट ‘शटर’चा रिमेक असलेला मराठी सिनेमा शटर डिसेंबर अखेरीत प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक व्ही.के. प्रकाश यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या माध्यमातून त्यांनी मराठीतही एन्ट्री केली आहे. कसदार अभिनेता सचिन खेडेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (ज्यु.) यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. 24 तासांत चार जणांच्या आयुष्यातील घडामोडींवर आधारित हा सिनेमा असून सामाजिक संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे.