Join us
Daily Top 2Weekly Top 5

नणंदबाईंनी केली करीनाची पाठराखण; जेह नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 18:05 IST

Saba ali khan : करीनाने तिच्या बाळाचं नाव जहांगीर ठेवण्यामागचं कारणही तिच्या 'प्रेग्नंसी बायबल' या पुस्तकात सांगितलं होतं.

ठळक मुद्देसैफ अली खानच्या मोठ्या बहिणीने सबाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या दुसऱ्या मुलामुळे चर्चेत येत आहे. करीनाने तिच्या दुसऱ्या बाळाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे करीनाने तिच्या बाळाचं नाव जहांगीर ठेवण्यामागचं कारणही तिच्या 'प्रेग्नंसी बायबल' या पुस्तकात सांगितलं होतं. मात्र, तरीदेखील तिचं ट्रोलिंग सुरुच आहे.  त्यामुळेच आता करीनाच्या नणंदेने म्हणजेच सैफच्या बहिणीने करीनाची पाठराखण केली असून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

सैफ अली खानच्या मोठ्या बहिणीने सबाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. अलिकडेच सबाने इन्स्टावर करीना आणि जेहचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोचं कॅप्शन देत सबाने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे.

"मम्मा अँड जान जे. जेव्हा एक आई आपल्या बाळाला ९ महिने उदरात वाढत असते. त्यावेळी केवळ तिला आणि बाळाच्या वडिलांनाच त्या बाळाविषयी सगळं ठरवण्याचा अधिकार असतो. मुलाचं संगोपन कसं करावं, त्याचं नाव काय ठेवायचं हे सगळं ठरवण्याचा अधिकार फक्त त्याच्या आई-वडिलांना असतो. त्यामुळे त्याच्याविषयी अन्य कोणी काहीही ठरवू शकत नाही", असं कॅप्शन सबाने या फोटोला दिलं आहे.

चाहत्यांनी दिला सबाला पाठिंबा

सबाची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. जहांगीर एक सुंदर नाव आहे. पण, काही जण उगाच टीका करायची म्हणून करतात, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.  

टॅग्स :करिना कपूरसबा खानसेलिब्रिटी