Join us  

OMG! ‘ये है मोहब्बतें’ची चिमुकली रूही आता दिसते अशी, फोटो पाहून विश्वास बसणार नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 8:00 AM

Roohi aka Ruhaanika Dhawan of Yeh Hai Mohabbatein latest pics : ‘ये है मोहब्बतें’ची रूही भल्ला उर्फ रूहानिका धवन (Ruhaanika Dhawan) हिने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत.

टीव्ही असो वा बॉलिवूड प्रत्येक ठिकाणी बालकलाकारांचा दबदबा दिसतो. मालिका व चित्रपटांमुळे अनेक बालकलाकार घराघरात पोहोचले. ‘ये है मोहब्बतें’  (Yeh Hai Mohabbatein) हा मालिका तुम्हाला आठवत असेलच. या मालिकेतील चिमुरडीनेही सर्वांना वेड लावलं होतं. तिने या मालिकेत चिमुकल्या रूहीची ( Roohi) भूमिका साकारली होती. आता ही चिमुकली रूही बरीच मोठी झाली आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.‘ये है मोहब्बतें’ची रूही भल्ला उर्फ रूहानिका धवन (Ruhaanika Dhawan) हिने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून हीच ती मालिकेतील रूही यावर क्षणभर तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही.

अनेक चाहत्यांनी रूहानिकाच्या फोटोवर अशाच आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत. ही तीच मुलगी आहे, विश्वास बसत नाहीये, अशी कमेंट एका युजरने केली आहे. आमची छोटी रूही आता मोठी झाली, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे.

रूहानिकाने फार कमी वयापासून अभिनयास सुरूवात केली. ‘श्रीमती कौशिक की पांच बहुएं’ या मालिकेत ती पहिल्यांदा झळकली होती. ही मालिका 2012 मध्ये प्रसारित झाली होती. यानंतर ‘ये है मोहब्बतें’मध्ये ती झळली. जय हो, घायल वन्स अगेन या चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत.कमाईच्या बाबतीत ती मोठ मोठ्या कलाकारांना मागे टाकते. रिपोर्टनुसार रुहानिका जवळ जवळ 6.5 कोटींची मालकीण आहे. रुहानिकाला प्रत्येक एपिसोडसाठी 25 हजार रुपये इतके मानधन मिळते. 

 रुहानिका आपल्या शूटिंगच्या सेटवर ऑडी ए 4 मॉडेलच्या लक्झरी कारमधूनही येत असते. या कारची किंमत जवळ जवळ  50 लाख रुपये इतकी आहे. रुहानिकाने स्वत: ही कार आपल्या कमाईमधून खरेदी केली आहे. याशिवाय तिने एक 3 बीएचके फ्लॅट देखील खरेदी केला आहे. 

टॅग्स :ये है मोहब्बतें