Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोनित रॉय होता हृतिकचा बॉडीगार्ड

By admin | Updated: January 25, 2017 02:53 IST

हृतिक रोशनच्या आगामी ‘काबिल’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याने एका नेत्रहिन व्यक्तीची भूमिका साकारली

हृतिक रोशनच्या आगामी ‘काबिल’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याने एका नेत्रहिन व्यक्तीची भूमिका साकारली असून आपल्या पत्नीच्या खूनाचा बदला घेताना दिसणार आहे. ‘काबिल’मध्ये मुख्य खलनायकाची भूमिका रोनित रॉय साकारतोय. रुपेरी पडद्यावर हृतिक रोशनच्या मागावर असलेला रोनित कधी काळी त्याचा बॉडीगार्ड होता. वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. चित्रपटात व टीव्ही मालिकांत काम करण्यासोबतच रोनित रॉय एक सेक्युरिटी कंपनीचा मालक देखील आहे. ही कंपनी बॉलिवूड सेलिब्रेटींना सेक्युरिटी प्रदान करण्याचे काम करते. रोनित स्वत: आमिर खानचा दीड ते दोन वर्षे तर शाहरुख खानचा बॉडीगार्ड म्हणून काही काळ सोबत होता. तो म्हणाला,‘मी लहानपणापासून हृतिकला ओळखतो, हृतिक स्टार होण्यापूर्वी जेव्हा ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाची शूटिंग करीत होता. त्यावेळी मला राकेश रोशन यांनी हृतिकसोबत राहण्याचे सांगितले होते. काही काळासाठी मी हृतिकचा बॉडीगार्ड होतो. मला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही मात्र तो माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे असेही रोनित रॉयने सांगितले.