Join us
Daily Top 2Weekly Top 5

निखिल आणि माधवीचा रोमँटिक अंदाज

By admin | Updated: March 3, 2017 02:48 IST

‘काहे दिया परदेस’ या मालिकेमधून विकी म्हणजेच निखिल राऊत याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे

‘काहे दिया परदेस’ या मालिकेमधून विकी म्हणजेच निखिल राऊत याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याची ही भूमिका आजही प्रेक्षक विसरले नाहीत. त्याचप्रमाणे ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेच्या माध्यमातून अनविताची भूमिका साकारलेली माधवी निमकरदेखील आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कलाकार त्यांच्या या लोकप्रिय मालिकेत खलनायकांच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. त्यांच्या या भूमिकेची खासियत म्हणजे हे दोन्ही कलाकारांनी खलनायकांच्या भूमिकेतही प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोन्ही खलनायक लवकरच प्रेक्षकांना एका प्रोजेक्टच्या माध्यमातून एकत्रित दिसणार असल्याचे समजत आहे. हे दोन खलनायक आता एका रोमँटिक भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. आता निखिल आणि माधवी आपल्या खलनायकांच्या भूमिकेतून बाहेर पडून एक हटक्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यांची ही रोमँटिक जोडी आता प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाली आहे. मात्र, ही जोडी नक्की चित्रपट, मालिका किंवा नाटकांच्या माध्यमातून पाहायला मिळणार का, यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार, हे मात्र नक्की.