Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोमँटिक चित्रपटात पुलकित आणि यामी

By admin | Updated: November 22, 2014 01:42 IST

या रियाँ’ या चित्रपटाची दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार तिच्या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे

या रियाँ’ या चित्रपटाची दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार तिच्या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. या चित्रपटात यामी गौतम आणि पुलकित सम्राट ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे स्क्रिप्ट आणि कलाकारही निश्चित झाले आहे. चित्रपटाचे बरेचसे शूटिंग शिमला येथे होणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी हा चित्रपट एका लव्ह स्टोरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटासाठी दिव्याने श्रुती हसन आणि आदित्य राव हैदरीशी संपर्क केला होता. या दोघींनीही चित्रपटाला नकार दिला. त्याशिवाय यामीनेही हा चित्रपट नाकारला होता, अशी बातमी होती; पण ही बातमी खोटी असल्याचे ती सांगते. श्रुतीला कधीही भेटले नसून आदितीला या चित्रपटासाठी संपर्क केलाच नसल्याचे ती सांगते. यामीनेही या चित्रपटाला कधीच नकार कळवला नव्हता, असे ती म्हणाली.