Join us

सोनमसोबत रोमान्स सलमानच्या अडचणीचा

By admin | Updated: October 27, 2014 00:19 IST

दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानने अनेक अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स केला आहे

दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानने अनेक अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स केला आहे; परंतु सूरज बडजात्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोनम कपूरसोबत रोमान्स करणे मात्र त्याला अडचणीचे ठरत आहे. सोनमपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, जॅकलिन फर्नांडिस आदी अभिनेत्रींसोबत सलमानने यापूर्वी पडद्यावर रोमान्स केलेला आहे. सोनमसोबत रोमान्स करताना येणाऱ्या अडचणीचे प्रमुख कारण म्हणजे सोनमचे वडील अनिल कपूरसोबत असलेली सलमानची गाढ मैत्री. ‘सोनम माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, तसेच तिचे वडील माझे घनिष्ठ मित्र आहेत. माझ्यासमोरच सोनमही लहानाची मोठी झाली आहे, अशा परिस्थितीत तिच्यासोबत रोमान्स करताना अडचणी येत आहेत,’ असे सलमानने सांगितले.