Join us  

रिया सेनने वेटरकडे केली सेक्सची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2017 6:54 PM

कयामत चित्रपटात अजय देवगणसोबत काम करणारी अभिनेत्रीने वेटरकडे सेक्सची मागणी केल्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन बाबत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - कयामत चित्रपटात अजय देवगण सोबत काम करणारी अभिनेत्रीने वेटरकडे सेक्सची मागणी केल्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन बाबत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिया सेन आपल्या मित्रासोबत अंधेरीतील हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण करण्यासाठी गेली होती. ती ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेली त्या हॉटेचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे नॉटी कॉकटेल सेक्स ऑन द बीच ही डिश फेमस आहे. जी ग्राहकांच्या आग्रहास्तव ऑफर केली जाते; मात्र रियाला कॉकटेल ड्रिंक प्यायचे नव्हते. तिला बॉइल अंड्यांपासून बनविलेल्या एका डिशची चव चाखायची होती. रेस्टॉरंटमधील वेटरला हे बाब समजताच त्यांने लगेचच रियाला एग्ज ऑन द बीच ही डिश ऑफरही केली. यादरम्यान रिया खूपच थकलेली होती. ती तिच्या मित्रासोबत मेन्यूविषयी बोलत होती . त्यावेळी वेटरने रियाला ऑर्डरविषयी विचारले; मात्र रियाच्या तोंडून Could I have some SEX please असे शब्द आले. रियाचे हे शब्द ऐकताच वेटरचा चेहरा असा काही फुलला की, त्याला काय करावे हेच काही काळ सूचत नव्हते; मात्र रियाला ती काय बोलली याची तिला नंतर जाणीव झाली. कळत-नकळत तिच्या तोंडून बोलले गेलेले शब्द परत घेण्यासाठी तिचा आटापिटा सुरू झाला. रियाने लगेचच वेटरला  Could I have some eggs please? असे म्हटले. रियाचे शब्द ऐकताच वेटर धीरगंभीर उभा राहिला; मात्र त्याच्याकडे बघून रियाला मात्र हसू आवरता आले नाही. दरम्यान, रिया सेनने नुकतीच कॉन्ट्रोव्हर्शियल मर्डर केसवर आधारित डार्क चॉकलेटमध्ये शीना बोराची भूमिका साकरली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी एका शॉर्ट फिल्ममध्ये लेस्बियनची भूमिका साकारताना पहावयास मिळाली होती. तिच्या या भूमिकेविषयी चर्चा रंगू लागली असतानाच तिने एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, ती एवढी सेक्सी आहे की, मुलीदेखील तिच्यासोबत सेक्स करू इच्छितात. यामुळे वादंग सुरु झाला होता.