‘बहु हमारी रजनिकांत’ या मालिकेत रजनीची भूमिका साकारणारी रिधिमा पंडित खऱ्या आयुष्यात इशान नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली असल्याची चर्चा आहे. इशान हा हृतिक रोशनचा चुलत भाऊ आहे. संगीतकार राजेश रोशन यांच्या या मुलाने काबील या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तर रिधिमानेदेखील नुकतीच तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. अनेक वेळा सोशल नेटवर्किंगला इशान आणि रिधामा एकमेकांविषयी काही ना काही तरी पोस्ट करत असतात. रिधिमाला मालिकेसाठी पुरस्कार मिळाल्यानंतर ही तर केवळ एक सुरुवात आहे, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे असे इशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते. तर रिधिमानेदेखील त्याच्यासोबतचा एक सेल्फी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून माझ्या आठवडत्या व्यक्तीसोबत एक दिवस मी घालवत असल्याचे म्हटले होते.
रिधिमा पडली प्रेमात?
By admin | Updated: September 15, 2016 01:55 IST