Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेशने केला ‘एम एस धोनी’चा ट्रेलर लाँच!

By admin | Updated: August 19, 2016 03:34 IST

‘‘सर, मी विचार करतोय की मी काय आहे? मी एक क्रिकेटर आहे, पण मी इथे खरगपूर स्टेशनवर टीसीचे काम करत आहे...’’ कल्पना करा की हे शब्द कोण्या मराठी

‘‘सर, मी विचार करतोय की मी काय आहे? मी एक क्रिकेटर आहे, पण मी इथे खरगपूर स्टेशनवर टीसीचे काम करत आहे...’’ कल्पना करा की हे शब्द कोण्या मराठी व्यक्तीच्या तोंडून आलेले नाहीत तर चक्क सुशांतसिंग राजपुत याच्या तोंडून आले आहेत. विश्वास बसत नाही ना? मराठीत डब केलेला ट्रेलर अभिनेता रितेश देशमुखने नुकताच लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिकचा हिंदीतून ट्रेलर रीलीज करण्यात आला होता. या हिंदी ट्रेलरला ३६ तासांत १० मिलियन व्ह्यूज मिळाले असून, आता हाच ट्रेलर काही प्रादेशिक भाषांमधूनही लाँच करण्यात आला. तमीळ, तेलगू भाषांमध्ये धनूषने हा ट्रेलर लाँच केला आहे. धोनीचे चाहते देशाबरोबरच बाहेरही प्रचंड प्रमाणात आहेत.