Join us

रितेश, जेनेलिया नव्या पाहुण्याला घेऊन घरी पोहोचले

By admin | Updated: June 4, 2016 17:04 IST

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत बाळाला घेऊन घरी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मोठा मुलगा रिआन आणि आईदेखील होती

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 04 - अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाने आपल्या बाळाला घरी आणलं आहे. शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत बाळाला घेऊन घरी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मोठा मुलगा रिआन आणि आईदेखील होती. जेनेलियाची आईदेखील या आनंदाच्या क्षणी उपस्थित होती. 
 
1 जूनला जेनेलिया दुस-यांदा आई झाली.  रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी शेअर केली होती. रितेश देशमुख आणि जेनेलियाचा मोठा मुलगा रिआन सध्या 2 वर्षांचा आहे. रितेश देशमुखने रिआनचा फोटो शेअर करत वेगळ्या पद्धतीने आपण वडील झाल्याची माहिती दिली होती. 'माझ्या आई बाबांनी मला छोटा भाऊ दिला आहे, आता माझी सगळी खेळणी त्याची' असं ट्विट करत रितेशने रिआनचा फोटो शेअर केला होता.
 
बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलियाकडे पाहिलं जात. 2003 पासून दोघं डेटींग करत होते. अखेर 2012 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले