Join us

Ved Marathi Movie:बॉक्स ऑफिसवर 50 दिवसांनंतरही रितेश भाऊंच्या 'वेड'ची जादू कायम, ७४ कोटींच्या क्लबमध्ये एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 18:04 IST

Ved Marathi Movie : 'वेड'च्या बॉक्स ऑफिस कमाईचे नवे आकडे समोर आले आहेत. 50 दिवसांनंतरही 'वेड'ची जादू अद्यापही कायम आहे, हेच या आकड्यांवरून सिद्ध होतंय.

 Ved Marathi Movie  : रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुख ( Genelia Deshmukh) ‘वेड’ हा सिनेमा गेल्या ३० डिसेंबर प्रदर्शित झाला. तेव्हापासून या सिनेमानं जणू वेड लावलं आहे. अद्यापही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  'वेड'च्या बॉक्स ऑफिस कमाईचे नवे आकडे समोर आले आहेत. ५० दिवसांनंतरही 'वेड'ची जादू अद्यापही कायम आहे, हेच या आकड्यांवरून सिद्ध होतंय. 

मुंबई फिल्म या रितेशच्या प्रॉडक्शन कंपनीने 'वेड'च्या कमाईचे ताजे आकडे दिले आहेत. त्यानुसार, 'वेड'ने जगभरात ७४ कोटींचा गल्ला जमवला आहे. देशात या चित्रपटाने ६०.६७ कोटींचा बिझनेस केला आहे. 

'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर रिलीजनंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला. आता 'वेड' ८० कोटींकडे वाटचाल करत आहे. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरल्या. पहिल्या क्रमांकावर अर्थात अजूनही नागराज मंजुळेंंचा 'सैराट' आहे. 

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा