Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक अँड व्हाईट फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:15 IST

Guess Who: फोटोत दिसणारी ही मुलं आज फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे झाले आहेत. मात्र, या फोटोत त्यांना ओळखणे सोपे नाही

बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो  (Bollywood Actor Childhood Pics)सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. आवडत्या स्टार्सचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात.  पण, सध्या असा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक दोन नव्हे तर बॉलिवूडचे ५ मोठे स्टार्स आहेत. फोटोत दिसणाऱ्या मुलांपैकी एक बॉलिवूडचा मोठा निर्माता झाला तर कोणी अभिनेता झाला. या फोटोमध्ये कपूर कुटुंबातील दिग्गज देखील आहेत, ज्यांना ओळखणे खूप कठीण आहे. होय, फोटोमध्ये उपस्थित असलेली व्यक्ती बॉलिवूड निर्माता आणि काही अभिनेता आहे.

फोटो एका बर्थडे पार्टीचा आहे, ज्यामध्ये सर्व मुलं एन्जॉय करत आहेत. कोणी कोक पीत आहेत तर कोणी  बर्थ कॅपमध्ये दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे फोटोत दिसणारी ही सर्व मुलं कपूर कुटुंबातील आहेत. फोटोत दिसणार्‍या मुलांना तुम्ही ओळखता का? नसेल तर फोटोत दिसणारी मुलं कोण आहेत ते आम्ही सांगतो. 

चला डाव्या बाजूपासून सुरुवात करूया. फोटोमध्ये दिसणारे पहिले मुलगा दुसरे कोणी नसून इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता बोनी कपूर आहे, जे आता अभिनेताही झाले आहेत. शम्मी कपूरचा मुलगा आदित्य कपूर त्यांच्या शेजारी आहे., यानंतर हातात कोकची बाटली घेऊन गोलू-मोलूसारखा दिसणारा मुलगा म्हणजे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर. फोटोमध्ये कोक पिताना दिसणारा पद्मिनी कोल्हापुरेचा पती टुटू शर्मा हा इंडस्ट्रीतील मोठा निर्माता आहे. फोटोच्या शेवटी उभं राहून कोकचा आस्वाद घेत असलेला मुलगा दुसरा कोणी नसून अनिल कपूर आहे.

 

टॅग्स :अनिल कपूरऋषी कपूरबोनी कपूर