Join us

रिंकू राजगुरुच्या साडीतल्या या फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, फोटो पाहताच पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 17:26 IST

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नेहमीच ती सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. नुकताच रिंकूने तिचा साडीतला फोटो  इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साडीत रिंकूच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. रिंकूच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना रिंकूने लिहिले, डोळे नेहमीच काही तरी बोलत असतात.

 रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही तितकीच बिनधास्त  आणि स्टायलिश आहे. तिच्या स्टाइल आणि फॅशनची कायमच चर्चा होत असते. 

लवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे झुंड. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहे. रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. या चित्रपटानंतर रिंकू कागर, मेकअप या मराठी चित्रपटात झळकली. काही महिन्यांपूर्वी तिची 100 ही हिंदी वेबसीरिज हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. या सीरिजमधील रिंकूच्या कामाचं खूप कौतूक होत आहे. यात तिच्यासोबत अभिनेत्री लारा दत्ता मुख्य भूमिकेत होती. 

रिंकू राजगुरुला ही गोष्ट देते अत्यानंद, सोशल मीडियावर तिचा नवीन फोटो व्हायरल

 

टॅग्स :रिंकू राजगुरू