कधी कधी बॉलीवूडमध्ये ऐकावं ते नवलच असं म्हणावं लागतं. जे कधी झालं नाही अशा गोष्टी बी-टाउनमध्ये घडतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री रिचा चड्डा हिच्याबाबतीतही घडला. अग्निपथ सिनेमाच्या रिमेकमधील हृतिकच्या आईचा रोल अभिनेत्री रिचा चड्डाला आॅफर करण्यात आला होता. त्यावेळी रिचाचं वय काय होतं माहीत आहे, २५ वर्षे. असं असतानाही रिचाला ही भूमिका आॅफर करण्यात आली होती... गँग्स आॅफ वासेपूरमध्ये नवाजुद्दीनच्या आईची भूमिका साकारल्याचं कारण त्यावेळी अग्निपथच्या कास्टिंग डायरेक्टरनं दिलं होतं, असा दावा रिचानं केलाय. आता तुम्हीच विचार करा हृतिकची आई म्हणून रिचा कशी दिसली असती...?
रिचाला आॅफर झाला होता आईचा रोल?
By admin | Updated: May 9, 2016 01:44 IST