Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधीच या कलाकाराची गुपितं उघड,तुम्हीही वाचून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 12:56 IST

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार अभिनेता राणा डग्गुबती सध्या त्याच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चर्चेत आहे.

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. खरंतर बॉलिवूडसाठी अफेअर आणि ब्रेकअप या गोष्टी काही नवीन नाहीत. त्यामुळे या यादीत राणाचेही नाव सामिल झाले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार अभिनेता राणा डग्गुबती सध्या त्याच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चर्चेत आहे.

राणाने आणि त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाजसह केलेल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. या बातमीने अंसख्य तरूणींचे हार्ट ब्रेक झाले असणार हे मात्र नक्की. 

या बातमीनंतर आता त्याच्याबाबत वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा रंगू लागल्या आहेत. यात त्याची जुनी प्रेमप्रकरणं आता बाहेर येऊ लागले आहेत. सुरूवातीला राणाचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्री तृषा कृष्णननसह जोडले गेले. त्याच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या. बघावे तिथे हे दोघेच एकत्र फिरताना पाहायला मिळायचे. इतकेच नाहीतर या दोघांचे किसींगचाही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. राणाच्या साखरपुड्यानंतर पुन्हा एकदा याच फोटोंवर चर्चा रंगत आहेत.

कॉफी विथ करण शोमध्ये राणा डग्गुबतीने त्याच्या या अफेअरविषयी पहिल्यांदाच जाहिरपणे कबुली दिली होती.दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री होती. मात्र त्यांचे अफेअर फार काळ टिकले नाही. दोघांनी ब्रेकअप करत वेगवेगळे मार्ग स्विकारले. दोघांना एकमेकांसह लग्नदेखील करायचे होते. मात्र असे काय घडले की त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

ब्रेकअपनंतरही दोघे चांगले मित्र म्हणून संपर्कात राहिले. काही दिवसांपूर्वी  तृषाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमधून तिने थेट राणा डग्गुबतीवरच निशाणा साधल्याचे बोलले गेले होते. 

टॅग्स :राणा दग्गुबती