Join us
Daily Top 2Weekly Top 5

90 च्या दशकातील या सुंदर हिरोईनला ओळखणेही झाले कठीण, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 08:00 IST

या हिरोईनच्या सौंदर्याने एकेकाळी चाहत्यांना वेड लावले होते. 80 व 90 च्या दशकात तिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले.

ठळक मुद्देफराहचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच वर्षांत तिची ओळख सुमीत सेहगल या अभिनेत्यासोबत झाली.

90च्या दशकातील एक गाजलेला चेहरा म्हणजे, अभिनेत्री फराह नाज हिचा. अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण फराह आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण याच फराहच्या सौंदर्याने एकेकाळी चाहत्यांना वेड लावले होते. 80 व 90 च्या दशकात फराहने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. राजेश खन्ना, ऋषी कपूर, संजय दत्त, गोविंदा, जॅकी श्रॉफ, मिथुन अशा अनेक अभिनेत्यांसोबत ती झळकली. अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. पण अचानक फराहने बॉलिवूडला अलविदा म्हटले. ही फरहा सध्या तिच्या संसारात आनंदी आहे. पण आज तिला ओळखणेही कठीण होईल.

करिअर शिखरावर असताना फराहने अचानक विंदू दारा सिंग याच्याशी लग्न केले. नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. काहीच महिन्यात  दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण दोघांच्याही घरातील मंडळी या नात्याच्या विरोधात होते.

फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावे असे तिच्या घरातील लोकांना वाटत होते तर घर सांभाळणा-या मुलीसोबत विंदूने लग्न करावे अशी दारा सिंग यांची इच्छा होती. कुटुंबीयांच्या इच्छेखातर दोघांनीही एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. 

इकडे ब्रेकअप झाले आणि तिकडे विंदू एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तामिळनाडूला गेला. पण फराहच्या आठवणीने तो इतका व्याकूळ झाला की, तिच्याशिवाय जगूच शकणार नाही, असे त्याला वाटू लागले. फराहची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. यानंतर दोघांनी पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कुटुंबियांनी देखील लग्नासाठी परवानगी दिली.  लग्नानंतर वर्षभरातच या दांम्पत्याला मुलगा झाला. मात्र अचानक दोघांमध्ये वाद व्हायला लागले आणि 2002 मध्ये फराह मुलाला घेऊन दुसरीकडे राहायला लागली. अखेर दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आलेत. 

फराहचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच वर्षांत तिची ओळख सुमीत सेहगल या अभिनेत्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. विंदू आणि फराहच्या पहिल्या मुलाला देखील सुमीतने स्वीकारले.

फराह आणि सुमीत त्यांच्या संसारात खूश असून सुमीतचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न सायरा बानू यांची भाची अभिनेत्री शाहीन बानूसोबत झाले होते. सुमीतने स्वर्ग जैसा घर, शानदार, साजन की बाहो में, सौदा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

टॅग्स :तब्बू