Join us

दंगलमधील 'हानिकारक बापू' गाणं रिलीज

By admin | Updated: November 12, 2016 14:03 IST

'हानिकारक बापू' असे या गाण्याचे बोल असून आमीर खान आपल्या मुलींना कशाप्रकारे ट्रेनिंग देत आहे हे यामधून दाखवण्यात आलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या दंगल चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक आतुरतेने चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या दमदार ट्रेलरनंतर आता गाणंदेखील रिलीज करण्यात आलं आहे.  'हानिकारक बापू' असे या गाण्याचे बोल असून आमीर खान आपल्या मुलींना कशाप्रकारे ट्रेनिंग देत आहे हे यामधून दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाची कथा गंभीर असली तरी गाण्यामध्ये हलका मूड देण्यात आला आहे त्यामुळे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 
 
(VIDEO: आमिरच्या बहुचर्चित 'दंगल'चा ट्रेलर रीलीज)
('दंगल'च्या शुटिंगदरम्यान आमीरला होती मृत्यूची भीती)
(आमीरच्या 'दंगल'वर सलमानची प्रतिक्रिया...)
 
दंगल चित्रपटात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भुमिका साकारत असून हा  चित्रपट 23 डिसेंबरला नाताळच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात महावीर फोगट यांनी आपल्या दोन मुली, गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे.