Join us

बहुचर्चित सिनेमा 'बाहुबली 2'चा लोगो रिलीज

By admin | Updated: October 1, 2016 12:22 IST

बहुचर्चित सिनेमा 'बाहुबली 2'च्या लोगोचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. तर सिनेमाचा फर्स्ट लूक 22 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि.1- बहुचर्चित सिनेमा 'बाहुबली-दी कनक्ल्युझन'च्या लोगोचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. तर सिनेमाचा फर्स्ट लूक 22 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे,अशी माहिती सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे सिनेमाचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष22 ऑक्टोबरकडे लागले आहे. तर हा सिनेमा 28 एप्रिल 2017 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 2015 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा 'बाहुबली'चा हा सिक्वेल असून कटप्पाने बाहुबलीला का मारले?, या प्रश्नाचे उत्तर 'बाहुबली-दी कनक्ल्युझन' सिनेमातून मिळणार आहे. 
आणखी बातम्या
 
दरम्यान, 'बाहुबली-दी कनक्ल्युझन' या सिनेमाने रिलीजआधीच 350 कोटींची कमाई केली आहे. वितरण हक्कांमधून कोटींची कमाई करत हा सिनेमा रिलीजपूर्वीच सुपरहिट झाला आहे.