Join us

जुळले कॉफीशी नाते!

By admin | Updated: March 20, 2015 23:21 IST

मितवा’ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा ‘कॉफी आणि बरंच काही..’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

‘मितवा’ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा ‘कॉफी आणि बरंच काही..’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या रोमँटिक टिष्ट्वस्टेड सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी या टीममधील सर्व कलाकारांनी अनोखी शक्कल लढवलेय. या सिनेमातील वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, सुयश टिळक या सर्वच कलाकारांनी सोशल मीडियावरील आपले प्रोफाईल्सचे नाव बदलून ‘कॉफी आणि स्वत:चे नाव’ असे एडिट केले आहे. या हटके आयडियामुळे त्यांचे फॅन्सही इम्प्रेस झाले असून, आता सर्वांचे लक्ष सिनेमाकडे लागले आहे.