Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटात उमटले शिक्षणाचे प्रतिबिंब

By admin | Updated: January 22, 2016 02:15 IST

शालेय ते महाविद्यालयीन शिक्षणावर तयार झालेल्या बॉलीवूड चित्रपटांची यादी मोठी आहे. शालेय स्तरावरील चित्रपटांमध्ये बालकांचे जीवन

शालेय ते महाविद्यालयीन शिक्षणावर तयार झालेल्या बॉलीवूड चित्रपटांची यादी मोठी आहे. शालेय स्तरावरील चित्रपटांमध्ये बालकांचे जीवन, महाविद्यालयीन स्तरावरील चित्रपटांमध्ये बॅकड्राप रोमान्स दाखविण्यात आला, परंतु आता एक चित्रपट असा आला आहे, ज्यात शिक्षक व शालेय व्यवस्थापनामधील संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव आहे चाक अँड डस्टर. शबाना आजमी अणि जुही चावला यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. काही वर्षांपूर्वी नाना पाटेकर, शाहिद कपूर आणि आयशा टाकिया यांचा चित्रपट ‘पाठशाला’सुद्धा अशाच विषयाला घेऊन तयार करण्यात आला होता. आमिर खान यांच्या दिग्दर्शनातील तारे जमीं पर आणि अमोल गुप्ते यांचा स्टालिन का डिब्बा हे दोन्ही चित्रपट शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित होते. सलमान खानद्वारे प्रमोट चिल्लर पार्टीमध्येही शिक्षणाला केंद्रबिंदू बनविण्यात आले होते. आय अ‍ॅम कलाम एक गरीब मुलाच्या कारकिर्दीवर आधारित होता. याच क्रमातील काही चर्चित चित्रपटांमध्ये बम बम बोले, ब्लू अंब्रेला, सतरंगी पैराशूट, ताहन आणि हवा-हवाई चित्रपटांचा समावेश आहे. चाक एंड डस्टर आणि पाठशालामध्ये शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांच्या वादाची कथा आहे. प्रकाश झा यांनी आरक्षण चित्रपटात विद्यार्थी आरक्षण आणि खाजगी कोचिंग सेंटरकडे लक्ष वेधले होेते. कॉलेज लाईफवरील चित्रपटांमध्ये रोमान्स कायमच जमेची बाजू राहिली. राजकुमार हीरानींचा थ्री इडियट्स आणि रामगोपाल वर्मा यांचा शिवा याची उदहारणे आहेत. इनको छोड़ दिया जाए, कयामत से कयामत तक आणि जो जीता वही सिकंदर पासून स्टूडेंट्स आॅफ द ईअरची कथाही अशीच होती.