Join us

‘दंगल’चा असाही विक्रम

By admin | Updated: December 24, 2016 02:39 IST

मावळत्या वर्षांत आमिर खानचा ‘दंगल’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील आमिरच्या भूमिकेची सर्वाधिक चर्चा

मावळत्या वर्षांत आमिर खानचा ‘दंगल’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील आमिरच्या भूमिकेची सर्वाधिक चर्चा झाली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘दंगल’मधील आमिरचा अभिनय सर्वत्र वाखाणल्या जातोय. पण त्याच्या आॅनस्क्रीन मुलींच्या अभिनयालाही तेवढीच दाद मिळतेय. याशिवाय ‘दंगल’च्या एका विक्रमाचीही चर्चा होतेय. होय, हा विक्रम म्हणजे, बॉलिवूडमध्ये एकाच वेळी चार नव्या चेहऱ्यांना लॉन्च करण्याचा. आमिर खान प्रॉडक्शनच्या ‘दंगल’मधून एकाच वेळी चार नव्या अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँच केले गेले आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांतून नव्या अभिनेत्रीला संधी दिली गेली. दोन अभिनेत्रींना एकाच वेळी, एकाच चित्रपटातून लॉन्च करण्यात आल्याचेही बॉलिवूडमध्ये यापूर्वी पाहायला मिळाले. मात्र आमिरच्या ‘दंगल’मधून प्रथमच एकाचवेळी चार अभिनेत्रींना लॉन्च केले गेले. या अभिनेत्री आहेत, फातिमा सना शेख, झायरा वसिम, सान्या मल्होत्रा आणि सुहानी भटनागर. या चारही अभिनेत्रींनी गीता आणि बबीता यांच्या भूमिका केल्या आहेत हे विशेष. तारूण्यातील गीता फोगटची भूमिका फातिमा सना शेख हिने केली आहे, तर बालपणीची भूमिका झायरा वसिम हिने साकारलीयं. तारूण्यातील बबीताची भूमिका सान्या मल्होत्रा तर बालपणीची भूमिका सुहानी भटनागर हिने केलीय. ‘दंगल’मधील या चौघींचाही अभिनय अफलातून असाच आहे. हा त्यांचा पहिला चित्रपट असावा, असे सांगूनही खरे वाटणार नाही, इतका जिवंत अभिनय या चौघींनी केलाय. मिस्टर परफेक्शनिस्ट सोबतची या चौघींची केमेस्ट्री मस्तपैकी जुळून आलीयं. नवा चेहऱ्यांसोबत काम करण्याचा आमिरचा प्रयोगही यशस्वी ठरला आहे. आठ वर्षांपूर्वी आमिर खान प्रोडक्शनने नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती.