ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - क्रिकेटपटू हरभजन सिंग व त्याची अभिनेत्री पत्नी गीता बसराने काल लंडनमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. हरभजन सिंगची आई अवतार कौरने एका वेबसाईटला ही माहिती दिली. बाळ आणि आई दोघेही सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. हरभजनही सध्या त्याच्या पत्नीसमवेत लंडनमध्येच आहे. हरभजन सिंगने अभिनेत्री गीता बसरासोबत मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न केले होते.