Join us

अमेयच्या डेटिंगमागचं सत्य आलं बाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 01:30 IST

अभिनेता अमेय वाघ यांच्या फिमेल फॅन्ससाठी एक खूशखबर आहे.

अभिनेता अमेय वाघ यांच्या फिमेल फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. काही दिवसांपूर्वी काळजाचे तुकडे तुकडे करणाऱ्या एका बातमीनंतर खुद्द अमेयनं आता त्याच्या फिमेल फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी ऐकून अमेयच्या फिमेल फॅन्सचा जीव भांड्यात नक्कीच पडेल. ही बातमी म्हणजे अमेय वाघ अजूनही ‘सिंगल’ आहे. हे आम्ही नाही तर खुद्द अमेयनं स्पष्ट केलं आहे. ‘‘मी आणि मिथिला एकमेंकांना डेट करत आहोत, मात्र ते एका सिनेमात. आम्ही दोघंही कपल आहोत तेही याच सिनेमात. मात्र मी सिंगल आहे. असं असलं तरी या सिनेमाच्या प्रेमात मी पडलो आहे’’ अशी पोस्ट खुद्द अमेयनं टाकली आहे. तो एवढ्यावरच थांबलेला नाही. ज्यांना आपल्या आणि मिथिलाच्या अफेअरच्या बातम्या खऱ्या वाटल्या, ज्यांना आम्ही चांगले कपल वाटलो त्यांना हा आपला नवा मराठी सिनेमा एक गिफ्ट असल्याचे अमेयनं म्हटले आहे. या सिनेमात रसिकांना अमेय आणि मिथिलाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.