Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाठक बाईंचा राणा आता बनणार खलनायक

By admin | Updated: March 6, 2017 22:10 IST

खलनायकाची भूमिका आता तुझ्यात जीव रंगला फेम राणा उर्फ अभिनेता हार्दीक जोशी साकारणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 6 - अभिनेता आणि अभिनेत्रींच्या रोमान्समध्ये विघ्न आणतो तो खलनायक. नायक-नायिकेच्या आयुष्यात लुडबुड करणारा खलनायक रसिकांच्या डोक्यात जातो. याला काही माणुसकी आहे की नाही असेही बऱ्याचदा ऐकायला मिळते. मात्र, तीच त्या खलनायकाची भूमिका आता तुझ्यात जीव रंगला फेम राणा उर्फ अभिनेता हार्दिक जोशी साकारणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. चालतंय कीङ्घह्ण, असे म्हणत अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करणारा गावरण राणा लवकरच नकारात्मक भूमिकामध्ये दिसणार आहे. भोळाभाबडा आणि सतत हसऱ्या चेहऱ्याने परिस्थितीला सामोरा जाणारा राणा जर्नी प्रेमाची या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तो खलनायकी भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे राणाच्या म्हणजेच हार्दीकच्या अभिनयाचा अणखीन एक पैलू प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे आता हार्दीक जोशी या खलनायकी भूमिकेला न्याय देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सध्या, तुझ्यात जीव रंगलातील अंजली बाई आणि राणाजींची निरागस प्रेमकथा लोकांनी डोक्यावर घेतली आहे. राणा आणि अंजलीच्या नात्याला कालच एक नवे नाव मिळाले आहे. मेगा एपिसोडमध्ये त्यांच्या लग्नाचा तामझाम प्रेक्षकांनी पाहिला आहे. लग्नानंतर मालिकेचे कथानक कसे रंगणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पण एक मात्र नक्की, अभिनेता हार्दीक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या अभिनयाने त्यांना अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे.