Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद सोमणचे इंटिमेट सीन्स पाहून त्याची पत्नी अंकिताने दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 17:36 IST

मिलिंद सोमणने फोर मोअर शॉर्ट्स प्लीज या वेबसीरिजमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत.

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता नेहमीच त्यांच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असतात. नुकताच मिलिंद सोमण फोर मोअर शॉर्ट्स प्लीज या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाला. या वेबसीरिजमध्ये त्याने इंटिमेट सीन दिले होते. त्याच्या इंटिमेट सीनवर आता त्याची पत्नी अंकिता कुंवरची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद सोमणने सांगितले की, 'फोर मोअर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमधील माझे इंटिमेट सीन पाहून ती एकदम कुल होती. पण जेव्हा मला पहिला सीझन मिळाला होता तेव्हा मी स्क्रिप्ट वाचली आणि त्यात इंटिमेट सीन होते. टेबलावर अंडरवेअरमध्ये एक चालतानाचा सीनही होता. हे ऐकून अंकिता म्हणाली की हे अगदी मजेशीर असेल. वास्तविक ती यासाठी खूप उत्साही होती.'

पुढे मिलिंद म्हणाला की, 'लग्नाआधी मी माझी सर्व कामं कोणालाही न विचारता आपल्या मर्जीने करीत होतो. पण अंकिताशी लग्न झाल्यानंतर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी डिस्कस करतो. हा माझ्यामधील एक मोठा बदल आहे, आता फक्त मीच नाही, कोणीतरी आहे जो खूप महत्त्वाचा आहे.'

नुकतेच मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर यांच्या लग्नाला दोन वर्षे पुर्ण झाली. त्यांनी लग्नाचे फोटो शेअर करत त्यांच्या लग्नांच्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :मिलिंद सोमण अंकिता कुंवर