Join us

‘बॅँजो’मध्ये पुन्हा एकदा रवी-रितेशची केमिस्ट्री

By admin | Updated: January 25, 2016 01:09 IST

मराठी-हिंदीचे नाते हे पहिल्यापासूनच जरा वेगळे आहे. सध्या तर अनेक कलाकार मराठीत येत आहेत, तर काहींना बॉलीवूडमध्ये काम करायची संधी मिळत आहे.

मराठी-हिंदीचे नाते हे पहिल्यापासूनच जरा वेगळे आहे. सध्या तर अनेक कलाकार मराठीत येत आहेत, तर काहींना बॉलीवूडमध्ये काम करायची संधी मिळत आहे. अशीच एक ‘बालक-पालक’ या सुपरहिट आणि वेगळ्याच विषयावरील चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा आपली केमिस्ट्री दाखवण्यास सज्ज झाले आहेत. मात्र, या वेळी ही जोडी मराठीत नाही, तर ‘बँजो’ या हिंदी चित्रपटातून आपली जादू दाखवणार आहेत. रवी जाधव या चित्रपटातून हिंदीमध्ये पदार्पण करत आहेत. समाजात दुर्लक्षित घटक असलेल्या बँजो प्लेअर्सवर या चित्रपटाची कथा आधारित असून, महाराष्ट्रातील बँजो प्लेअर आणि त्याच्या आयुष्यावर हा चित्रपट असणार आहे. रितेश देशमुख यामध्ये बँजो प्लेअरची मुख्य भूमिका साकारणार असून, नर्गिस फाखरी त्याच्या नायिकेची भूमिका बजावणार आहे. मराठीत सुपरहिट ठरलेला दिग्दर्शक रवी जाधव बॉलीवूडकरांवरही आपली जादू करणार, यावर कोणाचे दुमत असूच शकत नाही.