Join us

'रसोडे मे कौन था' फेम यशराज मुखाटे लग्नबंधनात अडकला, सुप्रिया पिळगांवकरांनीही केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 18:07 IST

यशराज मुखाटेने शेअर केला खास फोटो, आजच केलं रजिस्टर मॅरेज!

'रसोडे मे कौन था' या रीलमुळे घराघरात पोहोचलेला सोशल मीडिया स्टार, म्युझिशयन यशराज मुखाटे (Yashraj Mukhate) आज लग्नबंधनात अडकला. रजिस्टर पद्धतीने त्याने लग्न केल्याची गुडन्यूज नुकतीच चाहत्यांना दिली. त्याच्या पत्नीचं नाव अल्पना आहे. यशराजने रजिस्टर मॅरेजचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसतोय. तसंच चाहत्यांनाही यशराजच्या आयुष्यातील राणी कोण आहे हे कळलं आहे. त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.यशराजने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्याने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली आहे. तर अल्पनाने लाल पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यावर साजेसे सोन्याचे दागिनेही आहेत. अल्पना नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत आहे तर यशराजही हँडमस दिसतोय. यशराजने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, "आज दोन मोठे collabs केले. एक म्हणजे मी आणि अल्पनाने रजिस्टर मॅरेज केलं. दुसरं collab बायोमध्ये आहे."

यशराजचं दुसरं collab प्रसिद्ध गायक, संगीतकार अमित त्रिवेदीसोबत आहे. अमित त्रिवेदीच्या गाण्यांचा तो आधीपासूनच चाहता आहे. पहिल्यांदाच यशराज आणि अमित त्रिवेदीचं गाणं आलं असून आजच ते रिलीज झालं आहे. जसलीन रॉयलनेही यामध्ये गाणं गायलं आहे. 

यशराजच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा दिवस आहे. त्याच्यावर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनीही यशराजच्या फोटोवर कमेंट करत लिहिले, 'अभिनंदन, अनेक आशीर्वाद'. याशिवाय तन्मय भट, मिथिला पालकर, जेमी लिव्हरसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

२०२० मध्ये लॉकडाऊवेळी यशराज प्रसिद्धीझोतात आला. डायलॉग्सला चाल लावून त्याचं रील तयार करणं ही त्याची खासियतच आहे. 'रसोडे मे कौन था' हे रील तर आजही लोकांच्या ओठांवर आहे. याशिवाय त्याने 'बिकीनी शूट', 'तौडा कुत्ता टॉमी साड्डा कुत्ता कुत्ता' असेही काही रील खूप गाजले.  शिवाय त्याने अनेक गाण्यांना चाली लावल्या आहेत. तो उत्तम जिंगलही लिहितो. कित्येक नावाजलेल्या जाहिरातींसाठी त्याने काम केलं आहे. विराट कोहलीसोबतही त्याने मध्यंतरी एका अॅडसाठी काम केलं होतं. यशकाजच्या करिअरचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.

टॅग्स :सोशल मीडियालग्नसेलिब्रिटीसुप्रिया पिळगांवकरमराठी अभिनेतासंगीत