Join us

रसिका सुनील एअरपोर्टवर बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी झाली होती उतावीळ, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 14:14 IST

रसिका सुनीलचा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनायाच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका सुनील बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी रिलेशनशीपमुळे. मात्र आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. रसिका बॉयफ्रेंडला आणण्यासाठी एअरपोर्टवर गेली होती. त्याला ती भेटण्यासाठी उतावीळ झाल्याचे या व्हिडीओत पहायला मिळते आहे. 

रसिका सुनीलने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझा डान्स मंकी इकडे आला आहे. ही मिठी पूर्ण वाटलीच नाही. बिन, मी तुला खूप मिस केले.

या व्हिडीओत रसिका तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीला आणण्यासाठी एअरपोर्टला गेलेली दिसते आहे. त्याला एअरपोर्टवर पाहताच रसिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि ती त्याला पाहून एअरपोर्टवर उड्या मारू लागली आणि आनंदाने बागडू लागली. तो एअरपोर्टवरून बाहेर येताच त्याला तिने घट्ट मिठी मारली. हा सर्व क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.

रसिकाने आदित्य बिलागीला डेट करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ती त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस अँजेलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात. रसिका आणि आदित्यची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

 

टॅग्स :रसिका सुनिलमाझ्या नवऱ्याची बायको